सरकारकडून कोणतीही अपेक्षा करणे म्हणजे रेड्याकडून दुधाची...; राऊतांचे टीकास्त्र
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं ही धमकी मिळाली असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच वातावरण तापले आहे. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली नाही. या सरकारकडून कोणतीही अपेक्षा करणे म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखे आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली नाही. आणि आम्ही मागितलीही नाही. सरकार हे विरोधकांच्या जीवाच्या बाबतीत अत्यंत बेफिकीर आहे. या सरकारकडून कोणतीही अपेक्षा करणे म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखे आहे.
दरम्यान, संजय राऊत यांना लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा मॅसेज खासदार संजय राऊत यांच्या मोबाईलवर आला असल्याची माहिती मिळत आहे. हिंदू विरोधी असल्यामुळे मारून टाकू, असा हा मॅसेज आहे. दिल्लीत आल्यावर AK 47 ने उडवून टाकू. मुसेवाला टाईपमध्ये मारु. लॅारेन्स के और से मॅसेज है, सलमान और तू फिक्स तयारी करके रखना. अश्लील शिवीगाळ करत हा मॅसेज करण्यात आला आहे. याप्रकरणी पुण्यातून राहुल तळेकर या तरुणाला गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.