...म्हणून सर्वेक्षण थांबवावं; संजय राऊतांची शिंदे-फडणवीसांकडे मागणी
मुंबई : कोकणातील रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहे. आंदोलकांवर आज पोलिसांनी लाठीचार्ज केला असून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. यावरुन आता राज्याचे राजकारण तापले आहे. ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टीका केली आहे. हे प्रकरण चिघळू नये म्हणून भूसंपादन आणि सर्वेक्षण थांबवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बारसूच्या संदर्भात शरद पवारांनी स्थानिकांशी चर्चा करावी, असे सांगितले. म्हणजे काय करायचे? स्थानिक लोकांचा विश्वास नाही . उध्दव ठाकरे यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. उध्दव ठाकरे यांचे पत्र वारंवार दाखवले जात होते. केंद्र सरकारकडून पर्यायी जागांसदर्भात मागणी होती. म्हणून पर्यायी जागा उध्दव ठाकरे सरकारने दिली होती. अडीच वर्षात ठाकरे सरकारकडून कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात आली नव्हती. लोकांना प्रकल्प नको असेल तर बारसूमध्ये प्रकल्प घेऊ नका अशी भूमिका आमची आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
कोकणातील जनता रस्त्यावर उतरत आहे. उध्दव ठाकरेही काही दिवसांमध्ये तिथे जाणार आहे. हे प्रकरण चिघळू नये म्हणून भूसंपादन आणि सर्वेक्षण थांबवावे. बारसूच्या आसपास ज्या राजकाराण्यांनी आणि परप्रांतीयांनी यांची यादी सरकारने अधिकृतपणे जाहिर करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
जोडे पुसायची ज्यांची लायकी नाही. जनता जोडे मारायला तयार आहे. त्या वक्तव्याबाबत खेद वाटण्याचे कारण नाही. ठाकरे घराण्यांमुळे सर्वसामान्यांना पदे मिळाली. उध्दव ठाकरे यांनी चीड व्यक्त केली ती योग्य आहे. या वक्तव्याला कोणीही व्यक्तीगत घेऊ नये, असा खुलासा राऊतांनी केला आहे.