विधानसभा अध्यक्षच फुटले आहेत; राऊतांचा नार्वेकरांवर घणाघात
मुंबई : शिवसेनेच्या 16 अपात्र आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभेत मॅरेथॉन सुनावणी होणार आहे. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात १४ सप्टेंबरला ही सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. विधानसभा अध्यक्ष हे वेळकाढूपणा करत असतील तर ते संविधानाशी द्रोह करत आहे हे लक्षात घ्या, असे राऊतांनी म्हंटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, सुनावणी होऊन द्या. खरं म्हटलं तर अपात्र आमदारांची सुनावणी घेणे हे 40 तासाचं काम आहे. प्रत्येकाने बेईमानी केलेली आहे. एका पक्षातून निवडून आले आणि दुसऱ्या पक्षात गेले घटनेमध्ये अशा प्रकारच्या फुटीला मान्यता नाही. त्यांच्याकडे कोणतेही सबळ कारण नाही. अशातही इतका वेळ का लागावा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
खरंतर विधानसभा अध्यक्षच फुटलेले आहे, असा निशाणाही त्यांनी साधला आहे. हे अपात्र ठरतात म्हणून न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहे. तरीसुद्धा विधानसभा अध्यक्ष आपल्या अधिकाराचा बाऊ करून हा वेळकाढूपणा करत असतील तर ते संविधानाशी द्रोह करत आहे हे लक्षात घ्या, अशीही टीका राऊतांनी केली आहे.
दरम्यान, G-20 कार्यक्रम हे सर्वांना दिसत आहे. ज्या पद्धतीने सील बंद करून लोकांचा छळ केलेला आहे. तिकडे जाऊन लोकांच्या भूमिका काय आहेत ते पहा. ते लोकांना घराबाहेर आणि रस्त्यावरत पडून दिले जात नाही. त्या ठिकाणी रस्ते अडवले जात आहेत. जगभरात असे कार्यक्रम होत असतात पण लोकांना कोणी घरात कोंडून ठेवून असे कार्यक्रम करत नाही, असेही संजय राऊतांनी म्हंटले आहे.