कल्पना नलसकर | नागपूर : महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला नागपूरमध्ये अटी व शर्थीसह परवानगी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तुम्ही ज्याला गड मानता त्या गडातच तुमच्या पोटात भीतीचा गोळा आलाय, अशी टीका त्यांनी केली आहे.
महाविकास आघाडीचे महत्त्वाची सभा नागपूर मध्ये आहे. नागपूर हा गड आहे हे वगैरे पुढच्या गोष्टी आहेत. रविवारी दिसेल. असे अनेक गड तुटून पडतात. आम्ही कुणाचं वाईट चिंतेत नाही लोकांनी ठरवलं असेल तर तुम्ही कसले गड सांभाळणार. तुम्ही सभा होऊ नये म्हणून काही लोकांनी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
परंतु, कायदेशीररित्या सर्व काही करून देखील व्यवस्था करून सुद्धा जर तुम्ही त्रास देत असाल याचा अर्थ तुम्ही ज्याला गड मानता त्या गडातच तुमच्या पोटात भीतीचा गोळा आलाय. महाविकास आघाडी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची वज्रमूठ घट्ट आहे, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
चांगला आहे कोणी म्हटला हे हिंदूंचा राष्ट्र आहे. बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर या सगळ्यांनी सांगितलं आहे. याचा अर्थ असा नाही की फक्त राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करावा. हिंदुत्वचा अनेक विचार आणि विश्वास आहे त्यावरती चिंतन करावा लागेल आणि नागपुरातच करावा लागेल, असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपच्या ट्विट वरून लगावला आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले, ये डर होना चाहिये..ये डर है. फिल्मी अंदाजमध्ये खासदार संजय राऊत यांनी आशिष शेलारच्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. माझ्या भीतीने हे लोक झोपत नाही, मला माहिती आहे, असा निशाणाही त्यांनी भाजपवर साधला आहे.