तुझे डोळे चिनी आहेत, बारीक...; संजय राऊतांचा आशिष शेलारांना टोला

तुझे डोळे चिनी आहेत, बारीक...; संजय राऊतांचा आशिष शेलारांना टोला

आशिष शेलारांच्या टीकेला संजय राऊतांचे जोरदार प्रत्युत्तर
Published on

मुंबई : शिवाजी पार्कसारखं मोठं मैदान न घेता छोट्या मैदानात वज्रमूठ सभेचं आयोजन केल्यावरून आशिष शेलारांनी महाविकास आघाडीला टोला लगावला होता. आशिष शेलारांच्या या वक्तव्याचा वज्रमूठ सभेतून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. अरे आशिष शेलार तुझे डोळे चिनी आहेत. इथे येऊन ही गर्दी बघ, कळेल तुला, असा जोरदार टोला राऊतांनी शेलारांनी लगावला आहे.

तुझे डोळे चिनी आहेत, बारीक...; संजय राऊतांचा आशिष शेलारांना टोला
50 खोका...तुमने खाया, महाराष्ट्राने क्या पाया; आव्हाडांची रॅप सॉन्गमधून टीकास्त्र

भाजपचे मुंबईचे नेते आशिष शेलार बोलत होते. सगळ्यात छोटे मैदान महाविकास आघाडीच्या सभेसाठी घेतलं. तुझे डोळे चिनी आहेत चिनी...ही गर्दी येऊन बघ. अमित शहा मुंबईत आले आहेत. गेले की नाही माहित नाही. कदाचित गर्दीत असतील. गर्दी बघायला, असाही निशाणा संजय राऊतांनी साधला आहे.

तर, अजित पवार मविआच्या सभेला जाणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळातून प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. यावर संजय राऊतांनी अजितदादा मंचावर आहेत. अजितदादा तुमचं आकर्षण झालंय सर्वांना. अजितदादा येणार की नाही अशा चर्चा असतात. अजितदादा येणार, बोलणार आणि जिंकून जाणार, असेही त्यांनी म्हंटले आहे.

काल एक इव्हेंट झाला मन की बात. माधुरी दीक्षित ऐकतेय गर्दीतून.अॅक्टर-कॅरॅक्टर ऐकत होते. मी असा प्रधानमंत्री पहिला नाही की 9 वर्ष मन की बात करतोय. काम की बात करत नाहीये, अशी टीकाही राऊतांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

सरकारच्या विरोधात बोललं की आत टाका, परखड मत मांडलं की आत टाका, सत्य बोललं की आत टाका, आंदोलन केलं की आत टाका. या व्यासपीठावर अनिल देशमुख, छगन भुजबळ आणि मी आहे. आम्ही आत जाऊन आलोय, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, असेही संजय राऊतांनी म्हंटले आहे.

चोर, लफंगे, दरोडेखोर, भ्रष्टाचारी, देशद्रोही तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकायचे, स्वच्छ करायचे आणि पक्षात घ्यायचे. 'सुबह का भूला अगर शाम तक घर लौट आये, तो उसे भूला नही कहते' अशी म्हण होती. आता अशी म्हण आहे की, 'सुबह का भ्रष्टाचारी अगर भाजप में शामिल होता है तो उसे देशभक्त कहते है, अशी जोरदार हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com