सनी देओलसाठी दिल्लीतून सूत्र हलवली, मग नितीन देसाईंना वेगळा न्याय का? राऊतांचा घणाघात
मुंबई : नितीन देसाई प्रकरणी खासदार संजय राऊतांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेते सनी देओल यांच्या बंगल्याचा लिलाव 24 तासात थांबवण्यात आला. मग नितीन देसाईंचा यांचा स्टुडिओ का वाचवण्यात आला नाही, असा सवाल राऊतांनी केला आहे. नितीन देसाईं यांना कोणी मदत का केली नाही, असे म्हणत संजय राऊतांनी सरकारवर टीकास्त्र डागलं.
सनी देओल यांनी ६०-७० कोटी रुपये बँकेचे थकवले. त्यामुळे बँकेने त्यांच्या बंगल्याचा लिलाव काढला. पण २४ तासांत दिल्लीतून सूत्र हलली आणि त्यांच्या बंगल्याचा लिलाव रद्द करण्यात आला. त्यांना वाचवलं, त्यांचा बंगला वाचवला. मग हाच न्याय नितीन देसाईंना का नाही मिळाला? सनी देओल भाजपाचे खासदार आहेत, भाजपाचे स्टार प्रचारक आहे. आमच्या महाराष्ट्रातील नितीन देसाईंना वेगळा न्याय, नितीन देसाईंना मरू दिलं, त्यांच्या स्टुडिओचा लिलाव होऊ दिलात, असा आरोपही संजय राऊतांनी यावेळी केला.