संजय राऊत दसरा मेळव्यापासून दुरच; कोठडीतील मुक्काम वाढला

संजय राऊत दसरा मेळव्यापासून दुरच; कोठडीतील मुक्काम वाढला

संजय राऊत यांना न्यायालयाकडून आजही दिलासा मिळालेला नाही
Published on

मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना आजही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला असून 10 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे संजय राऊतांचा दसरा आता कोठडीतच साजरा होणार आहे.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु, ईडीने त्यांच्या कोठडीची मुदत वाढवण्याची मागणी केली. यामुळे संजय राऊत यांच्या कोठडी 10 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

काय आहे प्रकरण?

पत्राचाळ येथे म्हाडाचा भुखंड होता. हा भुखंड विकसित करण्यासाठी आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम दिले होते. पण त्यांनी ही जागा परस्पर खाजगी विकासकांना विकली. पत्राचाळमधील 672 रहिवाशींना 650 स्केअर फुटाचे घर देण्यात येणार होते. त्यांच्या या सोसायटीत अनेक अॅनिमिटी देण्यात येणार होत्या. रहिवाशांना 25 कोटी रुपये कार्पस फंड देण्यात येणार होते. त्यातून रहिवाश्यांचे मासिक मेंटेनेंस भरला जाणार होते. याप्रकरणी ईडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात पत्राचाळ पुनर्विकासात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com