...म्हणून मी गुवाहाटीला गेलो आणि शिंदे गटात सामील झालो; संजय राठोडांचा खुलासा

...म्हणून मी गुवाहाटीला गेलो आणि शिंदे गटात सामील झालो; संजय राठोडांचा खुलासा

शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदेंचा हात का पकडला याबाबत खुलासा केला आहे.
Published on

बीड : एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत घरोबा केला. यामुळे ठाकरे सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. आणि शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात नवे सरकार अस्तित्वात आले. यानंतर अनेक दावे-प्रतिदावे, खुलासे करण्यात येत आहे. अशात, शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदेंचा हात का पकडला याबाबत खुलासा केला आहे.

...म्हणून मी गुवाहाटीला गेलो आणि शिंदे गटात सामील झालो; संजय राठोडांचा खुलासा
भाजपा नेत्यांनी ओबीसींबद्दल मगरीचे अश्रू ढाळू नये; पटोलेंचे टीकास्त्र

काय म्हणाले संजय राठोड?

बीडच्या गेवराई तालुक्यात बंजारा समाजाचा मेळाव्याच आयोजन करण्यात आला होता. आणि याच मेळाव्याला अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही काळातच सरकारमध्ये मोठे उलथा-पालथ झाली आणि यावेळी मी देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, बंजारा समाजातील काही नेते आणि महंत यांनी उद्धव ठाकरे यांचं सरकार पुन्हा येणार नाही असं मला सांगितलं. त्यानंतर मी थेट गुवाहाटीला गेलो. आणि शिंदे गटात सामील झालो. कारण आपण सरकारमध्ये असलो तर आपल्याला समाजाचे प्रश्न सोडवता येतील. यासाठी महंतांनी मला हा सल्ला दिल्याचं संजय राठोड यांनी सांगितलं.

दरम्यान, बंजारा समाजाचे प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवायचे असतील तर आपल्याला सरकारसोबत संघर्ष करावा लागणार आहे. आजही अनेक तांड्यांवर पक्के रस्ते नाहीत शाळा नाही तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तर मोठ्या प्रमाणात ऊस तोडीसाठी जाणाऱ्या बंजारा समाजावर अन्याय अत्याचार होतात. हे रोखायचं असेल तर येत्या काळात आपल्याला सरकार सोबत संघर्ष करावा लागणार असल्याचंही संजय राठोड म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com