ये बुढा सठीया गया है; संजय गायकवाडांची खैरेंवर टीकास्त्र

ये बुढा सठीया गया है; संजय गायकवाडांची खैरेंवर टीकास्त्र

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी टीका करताना शिंदे गटावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Published on

संदीप शुक्ला | बुलढाणा : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बुढा सठीया गया है. त्याला काहीही स्वप्न पडतात, अशा शब्दात गायकवाडांनी खैरेंवर टीका केली आहे.

ये बुढा सठीया गया है; संजय गायकवाडांची खैरेंवर टीकास्त्र
कर्नाटकने पुन्हा महाराष्ट्राला डिवचले! जतच्या भागात थेट पाणी सोडले; तिकोंडी तलाव एका दिवसात ओव्हरफ्लो

मंगल प्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्यातील राजकीय बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली आहे. यावरुन चंद्रकांत खैरेंनी टीका केली होती. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे कोण आहेत? छत्रपती शिवरायांच्या पायाची धूळसुद्धा नाहीत. या सांस्कृतिक मंत्र्याला मी सांगू इच्छितो की, यांना महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीची माहिती नाही. ते बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) आहेत. त्यांनी काहीतरी मिळावे म्हणून असे वक्तव्य केले. तसेच, गुवाहाटीला जाऊन परत आमदारांना ५ खोके दिले, असा आरोपही खैरेंनी केला आहे.

याला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले की, ये बुढा सठीया गया है. त्याला काहीही स्वप्न पडतात. चंद्रकांत खैरे बावचाळल्या सारखे स्टेटमेंट करत आहे. ते पिसाळले आहेत, अशा शब्दात त्यांनी चंद्रकांत खैरेंवर निशाणा साधला आहे.

ये बुढा सठीया गया है; संजय गायकवाडांची खैरेंवर टीकास्त्र
गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं हा महाराष्ट्र द्वेष : आदित्य ठाकरे

दरम्यान, शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे बादशहाच्या हातावर तुरी देऊन आग्र्याहून सुटका केली होती, त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून सुटका करून घेतली, असे वक्तव्य मंगल प्रभात लोढा यांनी केले होते. यानंतर राज्यात नवा वाद राज्यात निर्माण झाला आहे. यावरुन विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com