राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षाची माळ समीर भुजबळ यांच्या गळ्यात

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षाची माळ समीर भुजबळ यांच्या गळ्यात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष म्हणून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या नावाची घोषणा झाली आहे. याची घोषणा खासदार सुनील तटकरे यांनी केली.
Published on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष म्हणून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या नावाची घोषणा झाली आहे. याचे समीर भुजबळ यांना आज नियुक्ती पत्र दिले आहे. याची घोषणा खासदार सुनील तटकरे यांनी केली.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षाची माळ समीर भुजबळ यांच्या गळ्यात
भारत मातेपेक्षा नरेंद्र मोदी मोठे आहेत का? नाना पटोलेंचा प्रश्न

अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडून वेगळा तयार केल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुनिल तटकरे यांच्याकडे दिली होती. मात्र, मुंबई प्रदेशची जबाबदारी अद्याप कुणाकडेच दिली नव्हती. मात्र, आता छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना मुंबई प्रदेशाध्यक्ष जबाबदारी देण्यात आली आहे. सुनील तटकरे यांनी समीर भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष म्हणून घोषित केले. मुंबई आणि MMRDA या भागातील विकास करण्यासाठी समीर भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे.

कोण आहेत समीर भुजबळ?

समीर भुजबळ हे छगन भुजबळ यांचे पुतणे असून नाशिकचे माजी खासदार आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात त्यांचे नाव आले होते. समीर भुजबळांच्या कंपन्यांमध्ये कथित अफरातफरीचा आरोप झाला होता. महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून 10 फेब्रुवारी 2016 रोजी अटकही झाली होती. 2018 पासून जामिनावर समीर भुजबळ तुरुंगाबाहेर आहेत.

दरम्यान, छगन भुजबळ शिवसेनेत असताना मुंबईतील भायखळा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शिवसेना सोडल्यावर त्यांचा बाळा नांदगावकर यांनी पराभव केला होता. त्यानंतर भुजबळ यांनी येवला मतदारसंघातून निवडणूक लढवली. येवला हाच त्यांचा मतदारसंघ झाला. मात्र, आता समीर भुजबळ यांच्या निमित्ताने भुजबळ पुन्हा एकदा मुंबईत सक्रिय होणार असल्याची चिन्हे आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com