काळाराम मंदिरात संयोगीताराजे यांच्यासोबत घडलेल्या प्रकारावर संभाजीराजेंचं भाष्य; म्हणाले, मला अभिमान...
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी काल नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली. त्यावेळी मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर राज्यात एकच वातावरण तापले होते. या घटनेवर अनेक नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. आता याच प्रकरणावर संभाजीराजे छत्रपती यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
संयोगीताराजे यांना मंदिरातील अपप्रवृत्तीचा अनुभव आला. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं. यावेळी त्यांना आलेला अनुभव परखडपणे मांडला त्याचा मला खूप अभिमान आहे. असे कृत्य करणारे लोक निर्माण होऊ नयेत, असे माझे मत आहे. वेदोक्त प्रकरणावर दीड महिन्यांनी बोलल्या म्हणजे त्या विचार करून बोलल्या आहेत. त्यावेळी माझा वाढदिवस होता म्हणून बोलल्या नाहीत. असे ते यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, जो महंत आहे त्यांचे पार्श्वभूमी काय आहे हे देखील तपासले पाहिजे. अकृत्य वेगवेगळ्या माध्यमातून करत असतात ते बंद झालं पाहिजे. माझी सगळ्यांना विनंती आहे की सामान्य माणसांच्या अधिकार आहे तो द्या. छत्रपती घराण्यातील स्त्रीला अवमानकारक बोललं गेलं, वागणूक दिली गेली. आजच्या घडीला देखील हे का घडतंय? हे सरकारने पाहायला पाहिजे. असे देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.