भुजबळांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी; संभाजीराजेंची मागणी

भुजबळांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी; संभाजीराजेंची मागणी

छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी आक्षेप घेतला आहे.
Published on

मुंबई : जालन्यात आज ओबीसी समाजाची जाहीर एल्गार महासभा झाली आहे. या सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठा तरुणांनी या शेंदूर लावलेल्या दगडाच्या मागे फिरू नये, असा घणाघात भुजबळांनी केला आहे. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी आक्षेप घेत भुजबळांची मंत्री पदावरुन हकालपट्टीची मागणी केली आहे.

भुजबळांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी; संभाजीराजेंची मागणी
तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही; भुजबळांच्या टीकेला जरांगेंचे प्रत्युत्तर, म्हणाले...

छगन भुजबळ यांनी जालना येथील सभेत केलेल्या वक्तव्यांवर छत्रपती संभाजीराजे यांनी टीकास्त्र सोडले असून स्वतःचे राजकीय स्थान टिकवण्यासाठी भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत, असा आरोप संभाजीराजेंनी केला आहे. तसेच, राज्य सरकारमधील एक मंत्री अशी भूमिका घेत आहे याला राज्य सरकार सहमत आहे का, असा खडा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला असून छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशीदेखील मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

काय म्हणाले होते छगन भुजबळ?

काही लोक म्हणतात की मी दोन वर्ष तुरुंगात बेसन भाकर खाल्ली. त्यांना मी सांगतोय की होय मी खाल्ली, अगदी दिवाळीतही मी बेसन भाकर ठेचा कांदा खाल्ला पण तुमच्या सारखा सासऱ्याच्या घरी भाकरीचे तुकडे मोडत नाही, अशी जहरी टीका भुजबळांनी केली आहे. यांना कायद्याची काही माहिती नाही केवळ सकाळी उठायचे आणि काहीही बोलायचे असा प्रकार आहे. त्यामुळे मराठा तरुणांनी या शेंदूर लावलेल्या दगडाच्या मागे फिरू नये. काही लोक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com