राजकारण
...त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटतेय; संभाजीराजे मनोज जरांगेंच्या भेटीला
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे. यादरम्यान जरांगे पाटलांची माजी खासदार संभाजीराजे यांनी भेट घेतली.
जालना : मराठा आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी ४० दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत सरकारने न पाळल्याने मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे. यादरम्यान जरांगे पाटलांची माजी खासदार संभाजीराजे यांनी भेट घेतली. तसेच, मनोज जरांगे यांना स्वतःच्या तब्येतीला जपण्याचा सल्ला दिला आहे.
संभाजीराजे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांची धडपड मला दिसत आहे. समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून ते हा संघर्ष करत आहेत. मला एका गोष्टीची खूप भीती वाटतेय. त्यामुळे मी त्याला फक्त एवढंच म्हणेन की तब्येतीला जप. त्याने मला सांगितलंय, तो पाणीसुद्धा पिणार नाही. त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटतेय. तुम्ही आमरण उपोषण करा पण पाणी तरी प्या. संभाजी राजे यांनी हात जोडून पाणी पिऊन आंदोलन केले पाहिजे, अशी विनंती केली.