...तर चंद्रकांत पाटील आज रस्त्यावर भीक मागत असते; संभाजी ब्रिगेडचे टीकास्त्र

...तर चंद्रकांत पाटील आज रस्त्यावर भीक मागत असते; संभाजी ब्रिगेडचे टीकास्त्र

राज्यात सध्या वादग्रस्त विधानांची मालिकाच सुरु आहे. यात आणखी एका नेत्यांची यात भर पडली आहे.
Published on

मुंबई : राज्यात सध्या वादग्रस्त विधानांची मालिकाच सुरु आहे. यात आणखी एका नेत्यांची यात भर पडली आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. या विधानाचा आता विरोधकांकडून निषेध करण्यात येत असून संभाजी ब्रिगेड यांनीही चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडले आहे.

संभाजी ब्रिगेड म्हणाले की, पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे पुण्याला लागलेला कलंक आहे. चंद्रकांत पाटलांसारखा कोल्हापूरमधून हाकलून दिलेला माणूस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार विसरला. महात्मा फुलेंनी शाळा काढली नसती तर चंद्रकांत पाटील आज कुठेतरी भीक मागत रस्त्यावर फिरले असते. कर्मवीर भाऊराव पाटलांचे उपकार आहेत. म्हणून चंद्रकांत पाटलासारखी माणसं मंत्री झाली. परंतु, या सगळ्यांचे उपकार आरएसएसच्या नादी लागून भाजपच्या लोक भटाळली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांची बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काय म्हणाले नेमके चंद्रकांत पाटील?

त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांनी शाळा उघडल्या. मात्र, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली. असं म्हणताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातलं मफलर पुढे केले. ते म्हणायचे, मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com