Sambhaji Bhide
Sambhaji BhideTeam Lokshahi

भिडेंनी पुन्हा ओकली गरळ; 15 ऑगस्टसह राष्ट्रगीत,राष्ट्रध्वजावरही केले आक्षेपार्ह विधान

भगवा ध्वज मोठा आणि तिरंगा ध्वज केवळ दखलपात्र आकाराचा सोबत ठेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचं आवाहन भिडेंनी केलंय.
Published by :
Sagar Pradhan
Published on

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे कायम चर्चेत आहे. ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रकाश झोतात असतात. दरम्यान आता पुन्हा एकदा गरळ ओकलीय. स्वातंत्र्य दिन, तिरंगा झेंडा आणि राष्ट्रगीताबाबत त्यांनी यावेळी आक्षेपार्ह विधान केले आहेत. यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Sambhaji Bhide
औरंगजेबाच्या कबरीला का भेट दिली? कारण सांगत आंबेडकरांचा मोठा दावा

नेमकं काय केले भिडेंनी विधान?

पुण्यातील दिघी येथे रविवारी संभाजी भिडेंच्या जाहीर व्याख्यान होते. यावेळी त्या व्याख्यानात बोलताना भिडे म्हणाले की, जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहले होते. 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी भारताची फाळणी झाली. या दिवशी सर्वांनी उपवास कारावा आणि दुखवटा पाळावा. असे ते म्हणाले.

पुढे तिरंगा झेंडा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकरणाऱ्या समितीवर आक्षेप घेत यावर्षीपासून तिरंग्यासोबत भगवा ध्वजदेखील फडकवला पाहिजे असं आवाहन त्यांनी भाषणात केलं. एवढ्यावरच न थांबत भिडे यांनी पुढे भगवा ध्वज मोठा आणि तिरंगा ध्वज केवळ दखलपात्र आकाराचा सोबत ठेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचं आवाहन केलंय. १५ ऑगस्ट म्हणजे हांडगं स्वातंत्र्य असा शिवराळ उल्लेख देखील त्यांनी आपल्या भाषणात केला. जोपर्यंत हिंदवी स्वराज्य स्थापन होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य दिन दु;खाचा देखील आहे. असे आक्षेपार्ह विधान भिडेंनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com