Uddhav Thackeray
Uddhav ThackerayTeam Lokshahi

तुम्ही चोर आहात, आमची मशाल चोरली; समता पार्टीचा ठाकरे गटावर पलटवार

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला आता मशाल चिन्ह मिळवण्यासाठी देखील झगडावं लागत असल्याचं दिसून येतेय.
Published on

सुरेश काटे | कल्याण : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला आता मशाल चिन्ह मिळवण्यासाठी देखील झगडावं लागत असल्याचं दिसून येतेय. समता पार्टीने मशाल चिन्हावर दावा करत थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. याबाबत बोलताना समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडळ यांनी उद्धव ठाकरे गटाने आमचं मशाल चिन्ह चोरलंय. चोर तुम्ही आहात. तुम्ही आमची मशाल चोरली, असा पलटवार ठाकरे गटावर केला आहे.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे मोठी अडचण; सरन्यायाधीश म्हणाले, बहुमत चाचणीला सामोरे गेले असता तर...

मशाल चिन्ह समता पार्टीचे आहे. ते आधीही होतं आणि आता इथून पुढे देखील राहील. हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाने चोरी केले. मशाल चिन्ह आम्हाला मिळावं यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. ज्यांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले तीच खरी शिवसेना आहे आणि जे आता मशाल-मशाल करतायात ती समता पार्टीचे मशाल आहे त्यांची नाही.

ठाकरे गटाकडून वारंवार सांगितलं जातंय की धनुष्यबाण चोरीला गेला. प्रत्यक्षात ज्यांची क्षमता होती त्यांना धनुष्यबाण चिन्ह मिळालं. उलट उद्धव ठाकरे गट चोर आहे त्यांनी आमचं मशाल चिन्ह चोरी केलं. आज त्यांचं अहंकार उध्वस्त झालाय. शिवसेनेतील अंतर्गत वादावर आता तोडगा निघालाय. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळालय त्यामुळे मशाल चिन्ह हे समता पार्टीचे आहे ते आम्हाला मिळावं यासाठी याचिका दाखल केल्याचं उदय मंडल यांनी सांगितलं.

समता पार्टीला फूस असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. याबाबत बोलताना उदय मंडल यांनी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांना डीरजिस्टर आणि डीरेकग्नाइज त्याच्यातला अर्थ कळत नाही. त्यांना खासदार कुणी बनवलं. उद्धव ठाकरे यांनी जी गॅंग बनवली आहे ती अशिक्षित लोकांची टोळी आहे. अनिल देसाई किंवा संजय राऊत हे सगळे एकच भाषा बोलतात. जोपर्यंत मशाल त्यांच्याकडे आहे तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू. ज्यांची क्षमता होती त्यांना धनुष्यबाण चिन्ह मिळालंय. चोर तुम्ही आहात तुम्ही आमची मशाल चोरली, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com