समरजीत घाटगेंनी घेतली सतेज पाटलांची भेट

समरजीत घाटगेंनी घेतली सतेज पाटलांची भेट

भाजपचे समरजित घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भाजपचे समरजित घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे. समरजीत घाटगे यांच्यासह भाजपचे 18 माजी नगरसेवकही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर समरजीत घाटगे यांनी सतेज पाटील यांची भेट घेतली आहे. कोल्हापुरातील सतेज पाटील यांच्या निवासस्थानी त्यांची ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

तसेच समरजीत घाटगे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणं सुरु केल्या आहेत. समरजीत घाटगे यांनी भाजपमधील पदांचा राजीनामा दिला असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com