sadabhau khot
sadabhau khotTeam Lokshahi

विधानसभा बिनविरोध? सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज माघारी

विधान परिषदेची निवडणूक 20 जूनला
Published on

मुंबई : राज्यसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून आज अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा दिवस आहे. भाजपने, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही विधानपरिषदेसाठी अतिरीक्त उमेदवार जाहीर केला होता. यामुळे विधानसभेत भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस असा सामाना रंगण्याची चिन्हे होती. परंतु, भाजप उमेदवार रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतल्याने विधानसभा बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती तर राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे यांनी डमी अर्ज भरला होता. तर कॉंग्रेसनेही एक उमेदवार दिला होता. यामुळे विधानपरिषद निवडणुकीतही महाविकास आघाडी विरुध्द भाजप सामना रंगणार होता. परंतु, आज सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी मागे घेतला आहे. यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची आशा होती.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारती, उमा खापरे, प्रशांत लाड अशा पाच जणांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, विधान परिषदेची निवडणूक 20 जून रोजी होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 9 जून आहे. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com