Saamna Editorial
Saamna EditorialTeam Lokshahi

Saamna Editorial: सामनामधून भाजपवर घणाघात; 'खोक्यांच्या वसुलीमुळे गुंतवणूकदारांची पळापळ'

सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल.
Published by :
Vikrant Shinde
Published on

सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षामुळे शिवसेना विरुद्ध शिंदे-फडणवीस सरकार हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. नुकतंच राज्यातून वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) हा प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून भाजपसह शिंदे-फडणवीस सरकारवर विशेषत: देवेंद्र फडणवीस सरकारवर जहरी टीका करण्यात आली आहे.

Saamna Editorial
Shivsena Dasara Melava 2022: दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी कोणाला मिळणार?

सामनामध्ये काय म्हटलंय?

गुजरातमधील गुंतवणूक वाढीची पोटदुखी महाराष्ट्राला नाही. एकदा भाऊ म्हटल्यावर वाद राहतोच कोठे? वाद निर्माण करून दुफळ्या निर्माण करणारे दुसरेच आहेत. महाराष्ट्रातील वातावरण उद्योग-व्यापारासाठी सध्या निकोप नाही. महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक 'खोके कंपनी'त झाली. त्या खोक्यांची आता वसुली सुरू झाल्याने उद्योग व गुंतवणूकदारांची पळापळ सुरू आहे. गुजरात म्हणजे पाकिस्तान नाहीच, पण महाराष्ट्राला दुश्मन ठरवले जात आहे. महाराष्ट्राची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान फडणवीस यांच्या समोर आहे. बाकी टक्केवारीचा नवा हिशेब घ्यायला शेलारांचे नियोजन मंडळ आहेच.

वेदांता फॉक्सकॉन प्रकरणावरून राज्यात विरोधकांकडून निदर्शनं व निषेध व्यक्त केला जात आहे. सरकारने वेदांता पेक्षा मोठा प्रकल्प राज्यात आणण्याची घोषणा केल्यानंतरही टीका व विरोध थांबत नसल्यानं आता सरकार या विषयी काय करणार हे पाहणं गरजेचं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com