अण्णा, हाती पुन्हा एकदा मशाल घ्या ! पेटवा ती मशाल; सामनातून अण्णा हजारे यांना साद

अण्णा, हाती पुन्हा एकदा मशाल घ्या ! पेटवा ती मशाल; सामनातून अण्णा हजारे यांना साद

अण्णा हजारे यांनी मणिपूरच्या दुर्घटनेवर दोन दिवसांआधी भाष्य केलं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अण्णा हजारे यांनी मणिपूरच्या दुर्घटनेवर दोन दिवसांआधी भाष्य केलं. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याच्याआधी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केलं होते. याच पार्श्वभूमीवर आता सामनातून अण्णा हजारेंना पुन्हा एकदा साद घालण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, मणिपुरातील ज्या आरोपींनी महिलांची नग्न धिंड काढली त्यांचे खटले मणिपूरच्या बाहेर चालवायला हवेत. तरच या आरोपींना शासन होईल, पण न्यायालयाने शिक्षा ठोठावूनही आरोपींना शिक्षा भोगावीच लागेल याची गॅरंटी नाही.शी भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा होईल याची गॅरंटी नाही तशी या देशात बलात्कारी व महिलांची नग्न धिंड काढणाऱ्यांना शासन होईलच याची गॅरंटी नाही. महिला कुस्तीगिरांच्या यौन शोषण प्रकरणात वेगळे काय घडले? मणिपूरचे प्रकरण तसेच थंड केले जाईल.

श्री. अण्णा हजारे यांनी अचानक अशी मागणी केली की, मणिपुरात महिलांची नग्न धिंड काढणाऱ्यांना फाशी द्यावी. मणिपूरचे प्रकरण गंभीर आहे व सरकारने त्याबाबत चालढकल करू नये. मणिपूरच्या नग्नसत्यावर सारे जग थुंकते आहे; पण त्याची पर्वा ना आपल्या पंतप्रधान मोदींना, ना त्यांच्या बकध्यान करणाऱ्या सरकारला. त्यामुळे इतक्या दिवसांनी जागे होऊन अण्णांनी काय मिळवले? महिलांची अब्रू लुटणाऱ्या नराधमांना फाशी द्या ही सगळय़ांचीच मागणी आहे. या अपराध्यांकडे डोळेझाक करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना पदमुक्त करावे, निदान मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना तरी घरी पाठवा, अशी मागणी अण्णांनी केली असती तर ते अधिक योग्य ठरले असते. असे सामनातून म्हटले आहे.

देशभरातील भ्रष्टाचारी, बलात्कारी, विनयभंगवाले यांना भाजपात प्रवेश दिला जातोय. अण्णा हजारे यांनी आवाज उठवायचा आहे तो इथे; पण सभोवती अन्यायाची व भ्रष्टाचाराची आग लागली असताना अण्णा गप्प होते व आहेत.काँग्रेस राजवटीत अण्णांनी भ्रष्टाचाराविरोधात मशाल पेटवली तेव्हा सभ्य आणि सुसंस्कृत मनमोहनसिंग हे देशाचे पंतप्रधान होते. व त्यांनी आघाडीचे सरकार मोठय़ा कसरतीने चालवले होते. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर उभारलेल्या लढय़ात तेव्हा देश अण्णांच्या मागे उभा राहिला . ‘ अण्णा , आगे बढो ‘ अशा घोषणा तेव्हा तरुणांनी दिल्या . अण्णांचे आंदोलन हे भ्रष्टाचाराविरुद्ध , हुकूमशाहीविरुद्ध होते व आज पुन्हा एकदा त्याच मशाली पेटवण्याची गरज देशात निर्माण झाली आहे . मणिपूर प्रकरणात अण्णा जागे आहेत हे दिसले . म्हणून आशेचे दिवे पुन्हा पेटले , इतकेच ! अण्णा , हाती पुन्हा एकदा मशाल घ्या ! पेटवा ती मशाल !असे म्हणत सामनातून अण्णांना साद घालण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com