शिंदे सरकारचा महापालिकेवर दबाव? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच म्हणाले...

शिंदे सरकारचा महापालिकेवर दबाव? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच म्हणाले...

ऋतुजा लटके यांचा राजीनामा नामंजूर करण्यासाठी शिंदे सरकारचा महापालिकेवर दबाव असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
Published on

मुंबई : अंधेरी-पूर्व मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा आज फेटाळण्यात आला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा नामंजूर करण्यासाठी शिंदे सरकारचा महापालिकेवर दबाव असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे सरकारचा महापालिकेवर दबाव? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच म्हणाले...
ऋतुजा लटकेंचा राजीनामा नामंजूर; पालिकेविरोधात आता उच्च न्यायालयात धाव

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठलाही दबाव नाही. आमचा कुणावरही दबाव नाही. सरकार यात कुठलाच हस्तक्षेप करणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आम्ही एकत्र लढणार आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

शिवसेनेना फुटीनंतर निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवत ठाकरे गटाला नशाल तर शिंदे गटाना ढाल-तलवालर दिले. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल, तलवार हे मराठमोळे चिन्ह आहे. त्याला गद्दार म्हणणे ही सर्वात मोठी गद्दारी आहे.

शिंदे सरकारचा महापालिकेवर दबाव? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच म्हणाले...
ऋतुजा लटके यांना शिंदे गटाकडून मंत्रिपदाची ऑफर; अनिल परबांचा गंभीर आरोप

दरम्यान, संजय राऊतांनी कोठडीतून आईला पत्र दिले आहे. यावर गिरीश महाजन म्हणाले की, त्यांनी पत्र लिहिले पाहिजे. त्यांनी भेटीची मागणी केली तर भेटता येईल. त्यांनी काय लिहावं हा त्यांचा प्रश्न आहे. जेलमध्ये गेल्यावर भावना उफाळून येत असतात म्हणून त्यांनी पत्र लिहिले असावे. अंधेरीची निवडणूक कोण लढवणार हे आम्ही दोघे चर्चा करून ठरवू. अद्याप त्यावर निर्णय झालेला नाहीय. असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com