रशियाने दिली भारताला मोठी ऑफर, भारतीय लोकांसाठी खुश खबर

रशियाने दिली भारताला मोठी ऑफर, भारतीय लोकांसाठी खुश खबर

भारताचे अनेक देशांसोबत चांगले संबंध आहेत. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने यावर अजून भर दिला आहे. त्यामुळे भारताचे परराष्ट्र धोरणही नेहमीच चर्चेत असते. नुकतीच रशियाने भारताला एक मोठी ऑफर दिली आहे. यामुळे भारतातील उद्योगपतींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

भारताचे अनेक देशांसोबत चांगले संबंध आहेत. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने यावर अजून भर दिला आहे. त्यामुळे भारताचे परराष्ट्र धोरणही नेहमीच चर्चेत असते. नुकतीच रशियाने भारताला एक मोठी ऑफर दिली आहे. यामुळे भारतातील उद्योगपतींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. 'भारतीय कंपन्यांसाठी रशियन बाजारात गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. अलीकडच्या काळात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार वाढला असून दोन्ही देशांच्या उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक गुंतवणूक सुरू करता येईल', असे मॉस्को शहराचे मंत्री सर्गेई चेरेमिन यांनी सांगितले होते.

भारतीय कंपन्यांना ऑफर देत मॉस्को शहराचे मंत्री सर्गेई चेरेमिन म्हणाले

चेरेमिन हे मॉस्कोच्या बाह्य अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंध विभाग पाहतात. 'आम्ही पहिल्यांदाच भारतातील या कार्यक्रमात सहभागी झालो आहोत. आमचं शहर सर्वात गतिमान शहरांपैकी एक आहे. आम्हाला युनायटेड स्टेट्स हॅबिटॅटने आधुनिकीकरणासाठी जगातील प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून मान्यता दिली होती. मॉस्कोतील सर्व म्युनिसिपल सेक्टर्समध्ये डिजिटलायझेशन लागू केले आहे.

भारत सॉफ्टवेअर तंत्रज्ञान, आयटी आणि सायबर सुरक्षेत खूप प्रगती करत आहे. यासाठी मॉस्को आणि नवी दिल्ली आपल्या नागरिकांसाठी एक चांगला दुवा बनू शकतात. गेल्या अनेक वर्षांमध्ये भारत आणि रशियाचे चांगले संबंध पाहता भारतीय कंपन्या मॉस्कोमध्ये गुंतवणूक करु शकतात. कारण रशिया ही भारतासाठी एक मोठी बाजारपेठ आहे', असे मॉस्को शहराचे मंत्री सर्गेई चेरेमिन म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com