जीभ छाटली पाहिजे, लाड यांच्या वादग्रस्त विधानावर रुपाली ठोबरेंची संतप्त प्रतिक्रिया
राज्यात एकीकडे प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. तर दुसरीकडे वादग्रस्त विधानाचे सत्र सुरु आहे. त्यातच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद आजही कायम आहे. हा वाद सुरु असताना आता भाजपचे आमदार प्रसाद लाड वादात सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. असे विधान लाड केले होते. त्या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी संतप्त प्रतिक्रया दिली आहे.
काय म्हणाल्या रुपाली पाटील?
प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला व त्यांचे बालपण रायगडावर गेल्याचे वक्तव्य करुन वाद ओढावून घेतला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात संतापाचे वातावरण आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना रुपाली पाटील म्हणाल्या की, लाड हे विकृत इतिहास मांडत आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्यांची जीभ छाटली पाहिजे, तुमचा कडेलोट केला पाहिजे असे वक्तव्य रुपाली पाटील यांनी केले.
काय म्हणाले होते प्रसाद लाड?
स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचारा तर हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती केली. आणि संपूर्ण आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा हा कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले आणि रायगडावरती त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. यामुळे ती सुरुवात कोकणात झाली, असे विधान त्यांनी केले आहे. यादरम्यान, उपस्थितांनी प्रसाद लाड यांना शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, आपले विधान दुरुस्त न करता त्यांनी पुढील विधाने सुरु ठेवली.