Mohan Bhagwat :  समाजात फूट पाडणाऱ्या या गोष्टींपासून समाजाने स्वतःला दूर ठेवावे

Mohan Bhagwat : समाजात फूट पाडणाऱ्या या गोष्टींपासून समाजाने स्वतःला दूर ठेवावे

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर संघाच्या मुख्यालयात म्हणजेच नागपूरमधील रेशीमबागमध्ये विजयादशमी मेळावा भरवला जातो.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर संघाच्या मुख्यालयात म्हणजेच नागपूरमधील रेशीमबागमध्ये विजयादशमी मेळावा भरवला जातो. आरएसएसचे कार्यकर्ते या सोहळ्यात सहभागी होतात. संघाच्या स्वयंसेवकांकडून पथसंचालनही पार पडलं. संघाची स्थापना 1825 साली विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशीच झाली होती. सरसंघचालक मोहन भागवत यांनी शत्र्यांची पूजा करुन भाषणाला सुरुवात केली.

मोहन भागवत म्हणाले की, आशियायी स्पर्धेक अनेक पदके मिळाली आहेत. अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे. देशाची शान वाढवणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. जगाने आमचे राजकीय कौशल्य पाहिले आहे. G20 परिषद हे त्याचे एक उदाहरण आहे.

यासोबतच मोहन भागवत म्हणाले की, येत्या 2024 वर्षाच्या सुरुवातीच्या काळात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. समाजात फूट पाडणाऱ्या या गोष्टींपासून समाजाने स्वतःला दूर ठेवावे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. समाजाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी घेतलेला पुढाकार आणि सरकार, प्रशासनाला केलेले योग्य सहकार्य हाच हिंसाचार आणि गुंडगिरीवर मात करण्याचा योग्य उपाय आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत भावना भडकावून मते मिळवण्याचे प्रयत्न अपेक्षित नसले तरी ते होतच राहतात.असे भागवत म्हणाले.

तसेच आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भावना भडकावून मतं मिळवण्याचे प्रयत्न होणार आहे. अशा गोष्टींपासून दूर राहा. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्याचे प्रत्येकाने पालन करायला हवे. असे मोहन भागवत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com