निवडणुकीत तिघांचे घ्या अन् चौथ्याला मतदान करा; रासप आमदाराचं विधान

निवडणुकीत तिघांचे घ्या अन् चौथ्याला मतदान करा; रासप आमदाराचं विधान

Local Body Elections : रणधुमाळी सुरू झाली आहे. नेत्यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा बैठकांच्या फैरी सुरू केल्या आहेत
Published by :
Team Lokshahi
Published on

खालिद नाझ | परभणी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. नेत्यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा बैठकांच्या फैरी सुरू केल्या आहेत. आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांनी गंगाखेडात 'निवडणुकीत तिघांचे घ्या आणि चौथ्याला मतदान करा', असे मतदारांना आवाहन केले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

निवडणुकीत तिघांचे घ्या अन् चौथ्याला मतदान करा; रासप आमदाराचं विधान
Eknath shinde : पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको, पुढील सुनावणी सोमवारी

परभणीच्या गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत डॉ. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळात काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यावेळी आयोजित सभेत डॉ. रत्नाकर गुट्टे येथे बोलत होते. ते म्हणाले की, खर्च करणारे उमेदवार यांनी नांगर हाणून पैसे आणलेले नसतात. त्यांनी जनतेकडूनच पैसे लुटले असतात. त्यामुळे त्यांना आपल्याला लुटायला काय प्रॉब्लेम आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. गुट्टे यांच्या विधानाची गावात चांगलीच चर्चा रंगली होती.

दरम्यान, राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायत पंचायतीच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. घोडे मैदान जवळ आल्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे. भाजप आणि शिंदे सेना सरकार सत्तेवर आहे. शिवसेना अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहे. यामुळे निवडणुकीचा अधिक फायदा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. विद्यमान राज्य सरकारने थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणुका घेण्याचा निर्णय नुकताच कॅबिनेटमध्ये मंजूर केला. त्याचा फायदाही भाजपलाच मिळणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com