राजकारण
युवा संघर्ष यात्रा अडवली; पोलीस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट
शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी विविध मागण्यांसाठी विधान भवनावर युवा संघर्ष यात्रा काढली होती. ही यात्रा आज नागपूरात अडवण्यात आली आहे.
नागपूर : शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी विविध मागण्यांसाठी विधान भवनावर युवा संघर्ष यात्रा काढली होती. ही यात्रा आज नागपूरात अडवण्यात आली आहे. यामुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला असून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे पाहायला मिळाले.
बेरोजगारी आणि विविध प्रश्नांसाठी रोहित पवारांनी पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा काढली होती. तब्बल २५ दिवस ८०० किलोमीटरहून अधिक अंतर पायी चालत युवा संघर्ष यात्रा सोमवारी नागपूरमध्ये पोहोचली. आज यात्रेची सांगता सभा पार पडली. यानंतर विधानसभेवर जात असताना रोहित पवारांची ही यात्रा पोलिसांनी अडवली आहे. यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचे दिसून आले. तर, रोहित पवारांसोबत काही कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आहे. तर, अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.