हीच नव्या सरकारची कायदा-सुव्यवस्था आहे का? रोहित पवारांचा सवाल

हीच नव्या सरकारची कायदा-सुव्यवस्था आहे का? रोहित पवारांचा सवाल

स्क्रिनिंग बळजबरीने बंद केल्याबद्दल दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Published on

मुंबई : 'हर हर महादेव' या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच या चित्रपटाचे स्क्रिनिंग बळजबरीने बंद केल्याबद्दल दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी फेसबुक पोस्ट करत शिंदे सरकारवर टीका केली आहे.

हीच नव्या सरकारची कायदा-सुव्यवस्था आहे का? रोहित पवारांचा सवाल
जितेंद्र आव्हाड यांना अटक, सोबतच माजी खासदारासह 12 कार्यकर्तेही अटकेत?

रोहित पवार म्हणाले की, ज्या प्रेक्षकाला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला तोच प्रेक्षक म्हणतोय की, “आव्हाड साहेबांची काहीच चूक नव्हती, उलट त्यांनी माझी मदत केली, त्यांना पोलिसांनी जाणून बुजून अटक केली आहे”. यावरून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करणाऱ्यांना, जादूटोणा कायद्याला आव्हान देणाऱ्यांना मोकळं सोडायचं आणि छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटाला विरोध करणाऱ्या आव्हाड साहेबांना अटक करायची ही या नव्या सरकारची कायदा-सुव्यवस्था आहे का, असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह 12 कार्यकर्त्यांना अटक केली असल्याचंही वृत्त आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com