भाजपचा इगो हर्ट झाल्यामुळे मित्र पक्षाला संपविण्याचा प्रयत्न केला; रोहित पवारांचा आरोप
मुंबई : राज्यात अस्थिरता आणण्यात भाजपचा मोठा वाटा आहे. भाजपचा इगो हर्ट झाला. त्यामुळे एका पक्षाला संपविण्याचा प्रयत्न भाजपने केला, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. दरम्यान, बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला असून याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटत आहेत.
नितीश कुमार हे मुरलेले नेते आहेत. भाजपसोबत असलेल्या पक्षांचे पुढे काय झालं ? तशी स्थिती जेडीयुची होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असावा, असे रोहित पवारांनी म्हंटले आहे. तर, तेजस्वी यांनी बिहारमधील तरुणांना योग्य संधी द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी सभागृहात म्हणाले होते यामागे भाज आहे. पण, भाजप नेते तस बोलत नव्हते. आता सुशील कुमार मोदी यांनी मनातील शंका दूर केलीये. राज्यात अस्थिरता आणण्यात भाजपचा मोठा वाटा आहे. भाजपचा इगो हर्ट झाला. त्यामुळे एका पक्षाला संपविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भाजप हा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी सहयोगी पक्ष संपविण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केले आहे.
मंत्रिमंडळात एकाही अपक्षांना स्थान दिले नसल्याने बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यावर बोलताना रोहित पवार यांनी आसाममध्ये जाऊन ते राहिले. राज्यात महादेव जानकर यांच्या पक्षाचा काय झालं? ते प्रहार पक्षाच होऊ नये, अशी भीती त्यांच्या मनात असावी, असेही म्हंटले आहे.