देवाघरी पाठवण्याची हमी? हाच का तुमचा धाक देवाभाऊ? रोहित पवारांचा खोचक सवाल
मावळ : मावळमधील शिरगावच्या सरपंचांवर शनिवारी अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार केल्याची घटना घडली होती. या घटनेत सरपंच प्रवीण गोपाळे यांचा मृत्यू झाला. यावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. देवाभाऊ हाच का तुमचा धाक? असा थेट सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्रही सोडले आहे.
रोहित पवारांनी ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे. यात महायुती सरकार आल्यापासून राज्यातील गुन्हेगारी दर कमी झाला असून, नोंदवलेल्या गुन्ह्यांचा तपास अधिक जलद होऊन गुन्हेगारी सिद्धता दरात वाढ झाली आहे. २०१० मध्ये ८% वरून २०२३ मध्ये ४८% पर्यंत गुन्हेगारी सिद्धता दर वाढला आहे, असे लिहीले असून देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे.
यावर रोहित पवारांनी देवा भाऊंच्या काळात गुन्हेगारी झाली कमी? की देवाघरी पाठवण्याची दिली जातेय हमी? हाच का तुमचा धाक, असा खोचक सवाल केला आहे. तर, हॅशटॅगमध्ये देवाभाऊ सुपरफास्ट दिला आहे.