Rohit Pawar
Rohit Pawar Team Lokshahi

'भोंदूंच्या आडून ट्रायल...' रोहित पवारांनी घेतला बागेश्वर बाबा आणि कालीचरण महाराजांच्या वक्तव्यांचा समाचार

भोंदूबाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधींना नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी ते नष्ट होऊ शकत नाहीत. कारण गांधी हा विचार जगात अजरामर आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा सध्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत येताना दिसत आहेत. त्यासोबतच कालीचरण महाराज देखील आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी प्रकाश झोतात असतात. कालीचरण महाराज यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यातच आज धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबांना देव मानण्यास नकार दिला आहे. साईबाबा हे संत होऊ शकतात, ते फकीर होऊ शकतात पण ते देव होऊ शकत नाहीत. गिधाडाचं चामडं पांघरून कुणी सिंह होत नाही, असं विधान त्यांनी केले. त्यामुळे आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावरूनच आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि कालीचरण महाराजांनी केलेल्या वक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी समाचार घेतला.

Rohit Pawar
भाजपचा मनात खरचं सावकराविषयी प्रेम असेल तर... सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल

काय म्हणाले रोहित पवार?

धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि कालीचरण महाराज यांच्यावर रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला. त्यामध्ये ते म्हणाले की, “भोंदूबाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधींना नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी ते नष्ट होऊ शकत नाहीत. कारण गांधी हा विचार जगात अजरामर आहे. पण हे विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळं हिंमत असेल तर, भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा त्यांनी अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस दाखवावं.” असा आव्हान त्यांनी सरकारला दिले आहे.

पुढे ते म्हणाले की, “निवडणुका जवळ आल्या की तथाकथित बाबा-बुवा या भोंदू लोकांना पुढं करून वादग्रस्त विधानं करायला लावायची. जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद निर्माण करायचा. नको त्या विषयांवर चर्चा घडवायची. मुख्य प्रश्नांवरून लोकांचं लक्ष दुसरीकडं वळवायचं आणि आपली राजकीय भाकरी भाजायची, हे या पक्षाचं पहिल्यापासूनच धोरण राहिलंय. पण संतांच्या आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांसारख्या महापुरुषांच्या महाराष्ट्राला हा डाव समजत नाही, या भ्रमातून या पक्षाने बाहेर यावं. त्यांनी बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याबाबत लोक विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत,” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com