त्रिवेदीला पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं; रोहित पवारांचे भाजपवर टीकास्त्र

त्रिवेदीला पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं; रोहित पवारांचे भाजपवर टीकास्त्र

राहुल गांधींच्या विधानाविरोधात राज्यभरात भाजप आक्रमक झाली असून सावरकर गौरव यात्रा काढली आहे.
Published on

मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधींच्या विधानाविरोधात राज्यभरात भाजप आक्रमक झाली असून सावरकर गौरव यात्रा काढली आहे. काल नागपूर येथील यात्रेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांची उपस्थिती होती. सुधांशु त्रिवेदीच्या उपस्थितीने आता विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र भाजपाची ही चाल कधीच विसरणार नाही, अशा शब्दांत टीकास्त्र सोडले आहे.

त्रिवेदीला पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं; रोहित पवारांचे भाजपवर टीकास्त्र
तृप्ती देसाई उतरणार राजकारणात! सुप्रिया सुळेंना देणार टक्कर?

भाजपचे प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संतापजनक वक्तव्य केलं. तेव्हा भाजपाने त्यांचा एका ब्र शब्दानेही निषेध केला नाही. ना राज्यात छत्रपती शिवाजी महाराज गौरव यात्रा काढली. पण, याच भाजपाने काल नागपूरमध्ये सावरकर गौरव यात्रेत महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून सुधांशू त्रिवेदीला व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं आणि ‘महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांचा आम्ही सन्मान करतो,’ हाच संदेश दिला. शिवरायांना आराध्य दैवत मानणारा महाराष्ट्र भाजपाची ही चाल कधीच विसरणार नाही, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

काय म्हणाले होतो सुधांशू त्रिवेदी?

सुधांशू त्रिवेदी यांनी राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्याला विरोध करत काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यांनी छत्रपती शिवाजी महारांजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्रिवेदी म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील औरंगजेबाची पाच वेळा पत्र लिहून माफी मागितली होती. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी त्रिवेदी यांचा निषेध नोंदवला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com