Rohini Khadse :  मला माझं तिकीट कन्फर्म आहे एवढे माहित आहे; मला पक्षाने आदेश दिलेलं आहेत, तुम्ही कामाला लागा

Rohini Khadse : मला माझं तिकीट कन्फर्म आहे एवढे माहित आहे; मला पक्षाने आदेश दिलेलं आहेत, तुम्ही कामाला लागा

मला माझं तिकीट कन्फर्म आहे एवढे माहित आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असतात. याच पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

रोहिणी खडसे म्हणाल्या की, आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय जयंत पाटील असतील यांच्या माध्यमातून त्यांनी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे. नक्कीच या मतदारसंघामध्ये लढण्याची माझी तयारी चालू आहे.

मला माझं तिकीट कन्फर्म आहे एवढे माहित आहे. मला पक्षाने आदेश दिलेलं आहेत. तुम्ही कामाला लागा. मला समोरचांच्या परिस्थितीबाबत अजून माहित नाही. कारण अजून तळ्यात मळ्यात ऐकायला येत आहे.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, कोण कुठलं चिन्ह घेणार, कोण कुठल्या पक्षावर लढणार अजून सगळ्यात संभ्रम मला समोरुन दिसतो आहे. पण शेवटी काय आहे जे ज्या पक्षावरती असतील, ज्या चिन्हावरती असतील, जे कुणी समोरचं उमेदवार असतील आम्ही सगळे नेते आणि पक्षाचे पदाधिकारी येत्या निवडणुकीसाठी सज्ज झालेलो आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com