मुलींच्या धर्मपरिवर्तनासाठी आर्थिक पाठबळ अन् रेट कार्ड; राणेंचे गंभीर आरोप
मुंबई : मुलींचे धर्मांतर करण्यासाठी तरुणांना आर्थिक बळ दिलं जात असून यासाठी रेट कार्ड तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. काहीच दिवसांपुर्वी अहमदनरमध्ये अल्पवयीन मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. हा मुद्दा नितेश राणे यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. फडणवीसांनी कडक कारवाई करण्यात असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
नितेश राणे म्हणाले की, अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये धर्मपरिवर्तनाच्या नावाने एका अल्पवयीन मुलीला फसवलं जातं ही गंभीर बाब आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही तातडीने कारवाई केली जात नाही.
या प्रकरणातील संबंधित पोलिस अधिकाऱ्याचे आरोपीसोबत आर्थिक व्यवहार आहे. आरोपीला घरचं जेवण दिलं जातं. हा एक सोप्पा विषय नाही. सानप असे अधिकऱ्याचे नाव असून त्याला बडतर्फ केलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राज्यात धर्मपरिवर्तनच्या नावाखाली त्रास दिला जातो. मुलांना आर्थिक ताकद दिली जाते. यासाठी एक रेट कार्डच आहे. यानुसार शीख तरुणीला फसवलं तर किती, हिंदी मुलीला फसवलं तर किती असे रेट कार्ड तयार आहेत. त्या मुलींना विकण्यापर्यंत गोष्टी जातात. अशा घटना घडत आहेत याच्यावर आळा बसण्यासाठी आपल्या राज्यात धर्मांतर विरोधी कायदा लागू करणार का, असा सवालही नितेश राणेंनी विचारला आहे.
अजित पवारांनी उपस्थित केला प्रश्न
आरोपीविरोधात 7 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात सानप यांना निलंबित केलं होते. मात्र, नंतर पुन्हा महिलेला तक्रार मागे घेण्यासाठी भाग पाडलं. अधिकाऱ्यांमध्ये भीती असली तर मग उपयोग होईल. गृहमंत्री म्हणून तुम्ही काय ठोस भूमिका घ्याल, असा प्रश्न पवारांनी फडणवीसांनी विचारला आहे.
तीन महिन्याच्या आत चौकशी झाली केली जाईल : देवेंद्र फडणवीस
ही पीडिता अल्पवायीन असताना तिच्यावर 3 वर्ष अत्याचार झाले. यावर सानप अधिकाऱ्यानी कोणतीही कारवाई केली नाही. परंतु, तातडीने कोणालाही बडतर्फ करता येणार नाही. आधी आरोपी सोबत काही संबंध आहेत का, हे तपासले जाईल. यानंतर कडक शिक्षा असेल ती केली जाईल. 3 महिन्याच्या आत चौकशी झाली केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
धर्मांतराचा कायदा आपल्याकडे आहे. कोणी जबरदस्ती धर्मांतर करू शकत नाही. जर तरतुदीत काही कमी असेल तर कशी अजून कणखर कारता येईल याचा विचार करु, असेही फडणवीसांनी म्हंटले आहे.