16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात राहुल नार्वेकर म्हणाले...
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. शिंदे यांनी आपल्या समर्थकांना घेऊन गुवाहाटी गाठली. उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बंड मोडून काढण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब केला. त्यात विधिमंडळ पक्षनेते आणि मुख्य प्रतोद बदलले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविण्याची प्रक्रिया सुरू केली.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने यावर निकाल दिला. विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा असे न्यायालयाने सांगितले आहे. १६ आमदारांच्या अपात्रेबाबत राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे.
याच पार्श्वभूमीवर आता राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल नार्वेकर म्हणाले की, उचित कारवाई चालू आहे. ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेवर निर्णय घेत असतात. त्यावेळी योग्य, कायदेशीर आणि नियमानुसार कारवाई आपण करु असे नार्वेकर म्हणाले.
आपल्याला सर्वांना माहित आहे की ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेत असतात तेव्हा ते ज्युडिशियल अधिकारी म्हणून काम करत असतात आणि याचं मला भान आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कारवाई आपण करू. तसेच 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात इतर प्रक्रिया होत आहेत. आपल्याला आश्वासित करतो की, यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही आणि नियमांचे पालन करुन निर्णय घेतला जाईल. असे नार्वेकरांनी सांगितले.