बंडखोर आमदारांसाठी मुंबई विमानतळ ते ताज प्रेसिडेंट ग्रीन कॉरिडोर
admin

बंडखोर आमदारांसाठी मुंबई विमानतळ ते ताज प्रेसिडेंट ग्रीन कॉरिडोर

बंडखोर आमदारांची बस सुसाट वेगाने हॉटेलच्या दिशेने निघाली. सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता त्यांच्या मार्गात एकही गाडी नव्हती. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान जी सुरक्षा असते ती आमदारांसाठी दिसली. संपूर्ण सी-लिंकवरील वाहतूक थांबवली.
Published by :
Team Lokshahi
Published on

शिवसेनेतून बंड करुन महाविकास आघाडीचे सरकार पडण्यासाठी कारणीभूत ठरलेले बंडखोर आमदार आज रात्री मुंबईत परतले. त्याच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मुंबई विमानतळ ते हॉटेल ताजपर्यंतचा संपूर्ण भाग विशेष कॉरिडोर केला होता. त्यानंतर आमदारांची बस सुसाट वेगाने हॉटेलच्या दिशेने निघाली. सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता त्यांच्या मार्गात एकही गाडी नव्हती. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान जी सुरक्षा असते ती आमदारांसाठी दिसली. संपूर्ण सी-लिंकवरील वाहतूक थांबवली.

बंडखोर आमदारांसाठी मुंबई विमानतळ ते ताज प्रेसिडेंट ग्रीन कॉरिडोर
भाजपत ब्राह्मणांचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होतेय

गोव्यातून बंडखोर आमदार मुंबईत येत असल्याने मुंबई पोलीस सतर्क असून सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या. आमदारांना आणण्यासाठी भाजपचे आमदार प्रसाद लाड हे विमानतळावर उपस्थित होते. मुंबईत रात्री 9 दरम्यान प्रचंड वाहतूक असते. परंतु आमदारांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीच्या वेळेतही विशेष कॉरिडोर करण्यात आला. तसेच आमदारांच्या बससोबत पोलिसांचा विशेष ताफा होता.

admin

वेस्टन एक्सप्रेस वे वरील एक लेन केली रिकामी

बंडखोर आमदार मुंबई विमानतळावर उतल्याचं वृत्त कळताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हॉटेल ताज प्रेसिडेंटकडे रवाना झाले आहे. बंडखोर आमदारांचं मुंबईत कसं स्वागत होईल, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सर्व आमदार हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर शिंदे गट आणि फडणवीसांचा बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.

उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवड

विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे.

बंडखोर आमदारांसाठी मुंबई विमानतळ ते ताज प्रेसिडेंट ग्रीन कॉरिडोर
देवेंद्र फडणवीसांच्या बॅनरवरून अमित शहांचा फोटो गायब

शिवसेनेचा व्हिप लागू नाही- मुख्यमंत्री

शिवसेनेने जो व्हिप जारी केला आहे, तो आम्हाला लागू होत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आम्ही आमचे बहुमत सिद्ध करू, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. विमानतळावर स्वत: शिंदे या आमदारांसोबत होते. बंडखोर आमदार मुंबईत आल्यानंतर भाजपाच्या वरच्या फळीतील नेत्यांसोबत त्यांची बैठक असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com