बंडखोर आमदार प्रथमच आदित्य ठाकरेंसमोर; संवाद कॅमेऱ्यात कैद
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के बसत आहे. सरकार गेल्यानंतर आता पक्षही जाण्याच्या तयारीत आहे. पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहे. यादरम्यान पहिल्यांदाच आज बंडखोर आमदारांपैकी प्रकाश सुर्वे आणि आदित्य ठाकरे समोरासमोर आले. या दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे आणि आदित्य ठाकरे आज समोरासमोर आले. यावेळी दोघांनी हस्तांदोलन केले असून संवादही साधला. त्या दिवशी ताट वाट पाहात होतं, तुम्ही हे काय केलं, असा सवालच आदित्य ठाकरे यांनी प्रकाश सुर्वे यांना विचारला आहे. शिंदे गटात गेलेले बंडखोर आमदारांविषयी बोलताना आक्रमक असणारे आदित्य ठाकरे प्रकाश सुर्वे यांच्याशी बोलताना मात्र भावूक झालेले दिसले. माझ तुमच्यावर खरोखर प्रेम होते हे तुम्हांलाही माहिती आहे. बघा विचार करा, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी सुर्वेंना केले.
एवढे जवळचे असून सुद्धा तुम्ही शिंदे गटात गेले याचे मला स्वत:ला दु:ख झाले आहे. तुमच्या मतदार संघाला काय सांगणार, असाही प्रश्न त्यांनी सुर्वेंना केला आहे. असं कराल खरच अपेक्षित नव्हत, असेही आदित्य ठाकरे शेवटी म्हणाले आहेत. यादरम्यान, प्रकाश सुर्वे काहीच बोलले नाही.
दरम्यान, कुर्ल्यातील इमारत दुर्घटनेनंतर मी गेलो होतो रात्री अडीच वाजता, पण तिथले स्थानिक आमदार गुवाहाटीत पार्टी करत होते, मतदारांना बंडखोर आमदारांना कधी तरी तोंड द्यावं लागेलच, असे आदित्य ठाकरेंनी म्हंटले आहे. तर, जे पळाले, त्यांना शिवसेना संपवायची होती, असाही निशाणा आदित्य ठाकरे यांनी मतदानानंतर साधला होता.