बदलीनंतर राणा दाम्पत्यांचा आयुक्त सिंहवर निशाणा; म्हणाले, जनता त्रस्त...
सूरज दाहाट/अमरावती: राज्य सरकारने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढल्यानंतर राज्यातील अनेक मोठया अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर आदेश काढल्यानंतर अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. सिंह यांनी अनेक गुन्ह्यांची उकल केली. मात्र, या कारकिर्दीमध्ये विशेष ठरलं म्हणजे खासदार नवनीत राणा खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यासोबतच्या वाद. शिंदे सरकार आल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात त्यांनी आरती सिंह यांची बदली करण्याची मागणी केली होती. याच बदलीनंतर राणा दाम्पत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले रवी राणा आणि नवनीत राणा?
आता अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांची बदली झाली हीच त्यांना शिक्षा आणि डिमोशन आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली. त्या म्हणाल्या, जेवढे क्राइम, खुन खुलेआम झाले. त्यांची बदली त्यानुसार झाली. महिला म्हणून आम्ही सपोर्ट करतो.पण अशा अधिकारी लोकांना साथ देत नाहीत. त्यांची बदली होते. या बदलीवरून सिद्ध होतं की भ्रष्टाचारी अधिकारी नव्या सरकारमध्ये चालत नाहीत.. या बदलीमुळे अमरावतीकर आणि पोलीस खातं खुश असल्याचे अश्या नवनीत राणा म्हणाल्या.
डॉ. आरती सिंह यांच्या बदलीनंतर आमदर रवी राणा यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ''पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांची बदली झाली. मला वाटते अमरावतीकर जनता त्यांच्यामुळे त्रस्त झाली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांच्या त्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या होत्या. अमरावतीमध्ये गुन्हेगारी आरती सिंह यांच्या कार्यकाळात खूप वाढली होती. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी आरती सिंह यांची उचलबांगडी करुन महाराष्ट्रात साईड पोस्ट दिली, त्यामुळे गृहमंत्र्यांनी अमरावतीकरांना मोठा दिलासा दिला आहे." अशा शब्दात आमदार राणा यांनी आयुक्तांच्या बदलीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.