ramraje nimbalkar eknath khadse
ramraje nimbalkar eknath khadseTeam Lokshahi

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे?

शिवसेनेनंतर NCP नेही केली विधान परिषद उमेदवारीवर चर्चा
Published on

मुंबई : शिवसेनेने (Shivsena) विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही (NCP) उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

ramraje nimbalkar eknath khadse
Nana Patole : पंतप्रधानांनी जाहीर माफी मागायला हवी

विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रामराजे निंबाळकर विधान परिषदेचे सभापती आहेत. तर एकनाथ खडसे यांचे नाव राज्यपाल नियुक्त यादीमध्ये दिले होते. परंतु, ती यादी अद्यापही प्रलंबित असल्याने खडसेंना अजूनही नियुक्ती मिळालेली नाही. यामुळे एकनाथ खडसे यांना विधान परिषदेवर उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

ramraje nimbalkar eknath khadse
HSC Result : लोकशाहीच्या वेबसाईटवर पाहा बारावीचा निकाल

दरम्यान, विधान परिषदेची निवडणूक 20 जून रोजी पार पडणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 9 जूनपर्यंत आहे. त्यामुळे विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरायला आता दोनच दिवस शिल्लक आहेत. तर, विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे. याआधी 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक पार पडणार आहे.

ramraje nimbalkar eknath khadse
मुख्यमंत्र्यांची औरंगाबाद सभा ठरणार सुपर स्प्रेडर?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com