कीर्तीकरांसोबतचा वाद अखेर मिटला! रामदास कदम म्हणाले, गजाभाऊंच्या...

कीर्तीकरांसोबतचा वाद अखेर मिटला! रामदास कदम म्हणाले, गजाभाऊंच्या...

शिंदे गटातील गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम या नेत्यांमध्ये आता वाद झाल्याने अनेक चर्चा रंगत आहेत. अखेर कीर्तीकर आणि कदम या दोघांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली आहे
Published on

मुंबई : शिंदे गटातील गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम या नेत्यांमध्ये आता वाद झाल्याने अनेक चर्चा रंगत आहेत. निष्ठावान कोण?, गद्दार कोण? यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अखेर कीर्तीकर आणि कदम या दोघांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली आहे. शिंदेंच्या शिष्टाईला यश आले असून कीर्तीकर-कदम वाद मिटला आहे. तसेच, गजाभाऊंच्या खासदारकीला माझा विरोध नसल्याचे रामदास कदमांनी स्पष्ट केले आहे.

कीर्तीकरांसोबतचा वाद अखेर मिटला! रामदास कदम म्हणाले, गजाभाऊंच्या...
लोकसभेसाठी मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात; सूत्रांची माहिती

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रामदास कदम म्हणाले की, माझ्या मर्डर करण्याच्या योजना केल्या गेल्या. मला संपविण्यासाठी प्रेस नोट काढली गेली. एखाद्या माणसाला संपविण्यासाठी प्रेस नोट काढणं हे कितपत योग्य. ३३ वर्षानंतर तुम्हांला जाग आली का? बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला. तुम्ही कुठे शुद्ध आहात, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, भविष्यात कोणतेही आरोप एकमेकांवर करायचे नाहीत. जे काही आहे ते मुख्यमंत्र्यांच्याशी बोलायचं. गजाभाऊ खासदारकीला माझी काही हरकत नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

अनिल परब चिनपाट माणूस आहे. अनिल परब दिवसा स्वप्न बघतात, अशी टीका कदमांनी परबांवर केली आहे. माझा नाईलाज झाल म्हणून मी प्रेसमध्ये गेलो. मी शब्द दिला आहे ते थांबणार असतील तर मी थांबतो. मला पक्षात मतभेद ठेवायचे नाहीये. पक्षाची शिस्त काय आहे हे मला माहित आहे. मी अस्वस्थ होतो ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या प्रेस नोटमध्ये होत्या याचं मला वाईट वाटलं, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

हा वाद मिटलेला आहे, भविष्यात कोणतेही आरोप एकमेकांवर करायचे नाहीत असे आदेश मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत. आम्ही दोघांनी खांद्याला खांदा लावून अनके वेळी काम केलेलं आहे. शिवसेनेचे उमेदवार गजानान कीर्तिकर असतील. त्यांच्या प्रचारासाठी रामदास कदम सगळ्यात पुढे असेल, असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, रामदास कदम यांनी अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली आहे. अजित दादा काय करतात ते समजत नाही. एकाच वेळी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते शरद पवार यांना भेटले तर समजू शकतो. कधी कधी अजित दादांना डेग्यू होतो. त्यांचे आमदार मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन करतात. मला हे काही समजत नाही. जेव्हा मराठा समाज अंगावर आला तेव्हा डेंग्यू झाला. दादा काही करु शकतात. दादा दादा आहेत, असे रामदास कदमांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com