रत्नागिरी : उध्दव ठाकरेंच्या खेडमधील सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्याच ठिकाणी सभा होणार आहे. या सभेच्या तयारीची पाहणी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पाच तारखेला बाप-बेटे अफजल खानाप्रमाणे चालून आले होते. त्याचे उत्तर आजच्या सभेतून मिळणार असल्याचे कदमांनी म्हंटले आहे.
मी शिवसेनेच्या वाईट काळामध्ये मातोश्रीच्या पाठिशी खंबीर उभा होता. उध्दव ठाकरे नेहमी त्यांच्या गाडीत पुढच्या सीटवर बसवल्याशिवाय मातोश्रीबाहेर पडत नव्हते. त्याच उध्दव ठाकरेंनी मला संपविण्याचा प्रयत्न केला. बाप मुख्यमंत्री, बेटा कॅबिनेट नंत्री शिवसेना नेता बाहेर अशा अवस्था होती. माझ्यासोबत योगेश कदमांनाही संपविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप रामदास कदमांनी केला.
अनिल परब यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उध्दव ठाकरेंनी चाप ओढण्याचा प्रयत्न केला. पाच तारखेलाही राज्यभरातून माणसे घेऊन 'बाप-बेटे अफजल खानाप्रमाणे चालून आले होते. परंतु, त्याचे उत्तर आजच्या सभेतून मिळणार असल्याची टीका त्यांनी केली आहे.
तर, भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यामध्ये दम नाही, अशी टीका केली होती. याला भास्कर जाधव सडक्या मेंदूचा माणूस आहे. त्यांना राजकारणातून संपवणार असा चोख बंदोबस्त केल्याचे रामदास कदमांनी म्हंटले आहे.