आठवलेंनी रचला इतिहास; नागालॅंडमध्ये दोन जागांवर विजयी
नवी दिल्ली : त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन ईशान्येकडील राज्यांमध्ये मतमोजणी सुरू आहे. आता त्रिपुरा आणि नागालँडमध्ये चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. नागालँडमध्ये भाजप आघाडीवर असून विजयाच्या जवळ आहे. तर, रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने इतिहास रचला आहे. आठवले गटाचे नागालँडमध्ये दोन उमेदवार विजयी झाले आहेत. महाराष्ट्रबाहेर पहिल्यांदाच आठवलेंचे दोन आमदार निवडून आले आहेत.
रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवारांनी नागालँडमध्ये विजय मिळवला आहे. आरपीआयचे इम्तीचोबा यांनी तुएनसांग सदर-2 ही जागा जिंकली आहे. इम्तिचोबा ४०० मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यांना एकूण ५५१४ मतं मिळाली. नोक्सेन विधानसभा मतदारसंघातून वाय. लिमा ओनेन चँग विजयी झाले आहेत. त्यांनी ५१५१ मतं मिळाली आहेत.
दरम्यान, नागालँडमध्ये २७ फेब्रुवारीला 60 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. सध्या नागालँडमध्ये भाजप सरकार आहे.