Sharad Pawar | Ramdas Athawale
Sharad Pawar | Ramdas Athawale Team Lokshahi

शरद पवारांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे अन्....; आठवलेंचे आवाहन

50 फुटांचा हार, जेसीबी वरून फुलांची उधळण करत आठवले यांचे बीडमध्ये स्वागत
Published on

विकास माने | बीड : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागालँडमध्ये पाठिंबा दिला तसाच पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला देखील पाठिंबा द्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. रामदास आठवले सध्या बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. तसेच, शरद पवारांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Sharad Pawar | Ramdas Athawale
येत्या 14 मार्चला सरकार कोसळणार नाही, तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार - चंद्रशेखर बावनकुळे

बीड जिल्ह्यात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी रामदास आठवलेंचे जंगी स्वागत केलं.पन्नास फुटांचा हार, जेसीबी वरून फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी अशा स्वरूपात या उत्साही कार्यकर्त्यांनी आठवलेंचं स्वागत केले आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर भाष्य केले आहे.

रामदास आठवले म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली असली तरी ती किती टिकेल हे सांगता येत नाही. प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले असले तरी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये गेलेले नाहीत. त्यामुळे ते कुठेही गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. तर शरद पवार यांनी नागालँडमध्ये पाठिंबा दिला तसा पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला देखील पाठिंबा द्यावा. आपल्यासारखा अनुभवी नेता आमच्यासोबत असला असला पाहिजे, त्यामुळे पवार यांनी महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडावं, असं जाहीर आवाहन आठवले यांनी पवारांना केले आहे.

दरम्यान, नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिलेला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबाबत बोलताना शरद पवार यांनी आमचा पाठिंबा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीसोबत आम्ही युती केलेली नाही, असा खुलासा केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com