'राम कदमांनी' उद्धव ठाकरेंना लगावला जोरदार टोला
मागील काही दिवसात राजकारणात खूप काही घडामोडी घडल्या, त्यातीलच एक म्हणजे 'शिंदेची बंडखोरी'.१९६६ पासून चालत आलेला ५६ वर्षांचा शिवसेनेचा वारसा ढासळला. शिंदेची बंडखोरी शिवसेनेच्या चांगलीच गळी उतरली.मागील काही काळात एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणेच शिवसेनेचे सारे स्वप्नच पालटले.एकनाथ शिंदे यांनी आपल्यासह शिवसेनच्याआमदार, खासदारांना घेऊन भाजप सरकारसोबत आपला नवीन पक्ष स्थापन करून ओळख निर्माण केली. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरु झाली. याच दरम्यान आता भाजाप नेते 'राम कदम' यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टोला लगावला. ''उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं ऐकलं नाही, तर ते जनतेचं काय ऐकणार'' असं वक्तव्य करत त्यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
स्वर्गीय 'बाळासाहेब ठाकरे' यांच्या शब्दांचाही त्यांनी मान राखला नाही. “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझा पक्ष काँग्रेससोबत जाणार नाही. जायची वेळ आलीच तर पक्ष बंद करून टाकेन. हे उद्धव ठाकरेंनी ऐकलं का? जी व्यक्ती स्वत:च्या स्वर्गीय संस्थापक अध्यक्षांचं ऐकत नाही,जी व्यक्ती स्वत:च्या वडिलांचं ऐकत नाही, ती व्यक्ती मुंबईच्या गोरगरिबांचं काय ऐकणार आहे?,”अश्या शब्दात राम कदमांनी टोला लगावाला. “राहुल गांधी यांच्यानंतर काँग्रेसचा सर्वेसर्वा कोण? तर राहुल गांधींचाच कुणीतरी. आदित्य ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे कंपनीचा सर्वेसर्वा कोण? आदित्य ठाकरेंचं पोरगं. बाकीच्यांनी टीळा लावायचा, हाती झेंडा घ्यायचा आणि उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणायचं बाकी काही नाही,”असे म्हणत ठाकरे सरकारवर निशाणा जोरदर निशाणा साधला.
अनेक आमदार खाजदारांनी शिवसेनेची साथ सोडली, शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी शिदें गटात म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करून शिवसेनेची साथ सोडली. याआधीच शिवसेनेच्या १२ खासदारांनी बंडखोरी करून शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, किर्तीकरांच्या या पक्षप्रवेशात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. पिता जरी शिंदे गटात गेले असले, तरी त्यांचे सुपुत्र अमोल किर्तीकर यांनी मात्र उद्धव ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.