लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्यांना रक्षा खडसे यांचे प्रत्युत्तर, म्हणाल्या...

लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्यांना रक्षा खडसे यांचे प्रत्युत्तर, म्हणाल्या...

महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरू केली आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरू केली आली आहे. यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यावर आता रक्षा खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रक्षा खडसे म्हणाल्या की, विरोधकांकडून जे काही आरोप केलं जात आहेत. जसं आता 2 दिवस आधी महाविकास आघाडीने म्हटले की, तुम्ही बहिणीसाठी काही योजना सुरु करताय, पंधराशे रुपयाने काय होणार आहे.

पण आपणही त्याला उत्तर दिलं पाहिजे की, सगळ्यात आधी याच्या लाभ घेणारे त्यांचे आमदार आणि खासदार आपल्याला दिसत आहेत. सोशल मीडियावर बघा तुम्ही आज त्यांचेच कार्यकर्ते याचा जास्त लाभ घेत आहेत.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, आपल्या सरकारने असं कोणता पक्ष म्हणून योजना सुरु केलेल्या नाही आहेत. आपल्या राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला याचा फायदा झाला पाहिजे शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचल्या पाहिजे. यासाठी सगळ्या योजना सुरु केलेल्या आहेत. असे रक्षा खडसे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com