Rajya Sabha Elections
Rajya Sabha ElectionsTeam Lokshahi

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीच्या निकालासाठी लागल्या लाखाच्या शर्यती

निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष
Published by :
Shubham Tate
Published on

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीतल्या मतदानावर आक्षेप घेण्यात आल्यानं निवडणुकीची मतमोजणी रखडली आहे. मतदानाच्या वेळी जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी मतपत्रिका दाखवल्यानं त्यांची मतं बाद करावीत, अशी मागणी भाजपनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केली. अजून कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. (rajya sabha polls stop election likely to be canceled)

Rajya Sabha Elections
Rajya Sabha Election 2022 : मतदानासाठी विशेष पेन वापरला जातो, 'हे' नियम माहित आहेत का?

तर दुसरीकडे भाजप नेते गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांनी भाजपचे तिनही उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करत त्यांनी सोशल मीडियावर ओपन चॅलेंज देत 1 लाखांची शर्यत लावली आहे. देशमुखांनी दिलेलं हे आव्हान कोण स्वीकारणार? अशी चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राहुल पाटील यांनी हे आवाहन स्वीकारले आहे. त्यामुळे ही लाखाची शर्यत कोण जिंकणार हे मतमोजणीनंतरच समजेल.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उद्याचा पुणे दौरा तातडीनं रद्द करण्यात आलेला आहे. राज्यसभा निवडणुकी संदर्भात निर्माण झालेल्या पेचामुळे सर्व नेते मुंबईतच थांबणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे पवारांचा उद्याचा पुणे दौरा रद्द करण्यात आलेला आहे. कुणालाही मुंबई न सोडण्याचे पक्षाच्या वरिष्ठांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या मुंबईतच थांबणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com