Rajya Sabha Election Results 2022 : निवडणुक आयोगाकडून अद्याप निर्णय नाही, शिवसेना आक्रमक
राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya sabha election 2022 ) आज सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपने ऐनवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीची मतमोजणीच थांबली आहे. आता सात वाजून गेल्यानंतरही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. या सगळ्या प्रकारामुळे शिवसेनेचे नेते संजय राऊत संतप्त झाले आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करून आपला संताप व्यक्त केला. ()
दरम्यान, आता उद्या सकाळी 11 वाजता मतमोजणी करा अशी मागणी शिवसेनेने केलेली आहे. निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही. त्यामुळे संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला जाब देखील विचारलेला आहे. देशात आज राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक पार पडली. इतर राज्यातील निकाल जाहिर झालेले आहेत. मात्र महाराष्ट्रातील ६ जागांवरील निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. तसेच जनता देखील निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे.