'मुख्यमंत्री शिंदेंच्या काळात सर्वाधिक आत्महत्या; राजू शेट्टींचा आरोप

'मुख्यमंत्री शिंदेंच्या काळात सर्वाधिक आत्महत्या; राजू शेट्टींचा आरोप

राजू शेट्टी यांची एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका
Published on

संजय देसाई | सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर हा महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करू, अशी घोषणा केली होती. परंतु, त्यांच्याच काळामध्ये सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत. त्यांनी फक्त खोक्याच्या, एकमेकांचा बदला घ्यायचा आणि कमरेखाली वार करायचं, या सगळ्या राजकारणातून बाहेर पडावं. आणि एकदा महाराष्ट्र फिरून बघावा. महाराष्ट्रातले ग्रामीण भागातले प्रश्न बघावे शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात. मग, राज्यकारभार चालवावा, असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

'मुख्यमंत्री शिंदेंच्या काळात सर्वाधिक आत्महत्या; राजू शेट्टींचा आरोप
ओशो आश्रमातील परिस्थिती चिघळली; भक्तांचा गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज

मागील आठ दिवसांपासून राज्यांमध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले. द्राक्ष असेल डाळिंब असेल त्याचबरोबर गहू, हरभरा, मका आणि भाजीपालांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. आणि अशात संवेदनशीलपणाने हा प्रश्न सरकारने हाताळलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये राज्याचे कृषिमंत्री रात्री पाहणी करायला लागले. तेव्हा या कृषिमंत्र्याचे काय करायचं. एकदा म्हणतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या जुना विषय, तर नुकसानभरपाईची रात्री पाहणी करतात, अशी टीका राजू शेट्टी यांनी शिंदे सरकारवर केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांसाठी काम करणारी संघटना आहे. आणि गेल्या अर्धा वर्षामध्ये आमच्या लक्षात आले की सगळेच राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. विरोधात असल्यानंतर शेतकऱ्यांची भाषा बोलतात, शेतकऱ्यांची बाजू घेतात आणि सत्तेत गेल्यानंतर नेमकं शेतकऱ्यांनाच विसरतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची ताकद दाखवायची असेल आणि सत्ता कोणाची असो सभागृहामध्ये ताकतीने शेतकऱ्यांची बाजू मांडायची असेल तर कुठल्याही आघाडीशिवाय सभागृहात माणसं पाठवली पाहिजेत. तरच ती निरपेक्षपणाने शेतकऱ्यांची बाजू मांडतील. म्हणून आम्ही हातकणंगले सहित पाच लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी घोषणाही त्यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com