शिवसेनेसाठी जेलमध्ये जाण्याची तयारी; राजन साळवींचं विधान, ​शिंदे-दादा गटावर अनेक आरोप पण...

शिवसेनेसाठी जेलमध्ये जाण्याची तयारी; राजन साळवींचं विधान, ​शिंदे-दादा गटावर अनेक आरोप पण...

राजन साळवी यांच्या घरावर आणि हॉटेलवर एसीबीने छापा टाकला होता. यानंतर राजन साळवींनी लोकशाही मराठीला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली.
Published on

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर आणि हॉटेलवर एसीबीने छापा टाकला होता. यानंतर साळवींसह त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम साळवी यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर राजन साळवींनी लोकशाही मराठीला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली. ​राजन साळवी हा बाळासाहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. ​कुटुंबियांना त्रास होऊ नये अशी अपेक्षा आहे, पण त्रास झाला तरी कुटुंबियांनी शिवसेनेसाठी जेलमध्ये जाण्याची तयारी आहे, असे राजन साळवींनी म्हंटले आहे.

शिवसेनेसाठी जेलमध्ये जाण्याची तयारी; राजन साळवींचं विधान, ​शिंदे-दादा गटावर अनेक आरोप पण...
Rohit Pawar ED Notice : मोठी बातमी! रोहित पवार यांना ईडीची नोटीस

राजन साळवी म्हणाले की, अटक होण्याची मला भीती वाटत नाही, मला त्रास किती दिला, तरी शिवसेना प्रमुखांच्या संघर्षातून उभा राहिलेला शिवसैनिक आहे. मला संघर्षाची कधीच भीती वाटत नाही. माझ्यासह मुलगा आणि पत्नीवर गुन्हा दाखल केला, है दुर्दैवी आहे. माझ्यावर आरोप आहे, तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, पत्नी आणि मुलाचा काय संबंध? ​ही निंदनीय बाब आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. माझ्या कुटुंबियांनी मला कायम साथ दिली आहे, या संघर्षाच्या प्रसंगात आम्ही एक आहोत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

यापूर्वी कधीही सत्ताधिकाऱ्यांनी असा विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिलेला नाही. पण आता हे प्रकार वाढले आहेत. ​एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट तयार केला, तेव्हापासून आजपर्यंत मी त्यांना भेटलो नाही. ​शिंदे गट, अजित दादा गट यांच्यावर अनेक आरोप आहेत, पण त्यांच्यावर कुठे कारवाई झाली आहे, ते वॉशिंग मशीनमध्ये धुतले आहेत, असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

शिंदे गटाची ऑफर आली तर स्वीकारणार का, यावर बोलताना राजन साळवी म्हणाले, ऑफर कधीही आणि कशीही आली तरी मी कधीही डगमगणारा राजन साळवी नाही. ​राजन साळवी हा बाळासाहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, आमच्या निष्ठा बाळासाहेबांच्या चरणी आहे. कुटुंबियांना त्रास होऊ नये अशी अपेक्षा आहे, पण त्रास झाला तरी कुटुंबियांनी शिवसेनेसाठी जेलमध्ये जाण्याची तयारी आहे.

उद्धव ठाकरेंसोबत राहिल्याचा खेद नाही, दुःख नाही, त्यांच्या पाठिशी राहण्याचा अभिमान आहे. मला उद्धव ठाकरेंनी नेहमीच आधार दिला. दुर्दैवाने या प्रकरणात शिक्षा झाली, तर मी आनंदाने भोगायला तयार आहेत. मात्र, भविष्याच्या कालखंडात मी निर्दोष ठरेल. सूड भावनेने कारवाई केली तर जनता त्याला उत्तर देईल असा माझा इशारा आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

सहा वेळा माझी चौकशी झाली, ​३ कोटींची बेहिशेबी मालमत्ता म्हणतात. माझ्या घरावर २५ लाखांचे कर्ज आहे. काल बँकेत लॉकर उघडले, त्यातील एकही वस्तू सील केली नाही. २३ तारखेला नाशिक येथे महाशिबीर आहे. पण २२ तारखेला अँटी करप्शन ब्यूरोमध्ये माझ्या भावाला चौकशीला बोलावले आहे, असेही साळवींनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com