टोलनाके बांधायलाही शिका; भाजपच्या टीकेवर राज ठाकरेंचा प्रहार, आधी दुसऱ्यांचे आमदार...
मुंबई : मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी टोलनाक्यावर अडवल्याप्रकरणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्याठिकाणी तोडफोड केली होती. यानंतर भाजपने मनसेवर टीका करत मनसेने रस्ते बांधायला आणि टोलनाके उभे करायलाही शिकावं, असा निशाणा साधला होता. याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अमित कुठेतरी जात होता. त्यावेळी टोलनाका फुटला. त्यावर लगेच भाजपाने टीका सुरू केली. रस्ते बांधायलाही शिका आणि टोल उभे करायलाही शिका, असे भाजपने म्हंटले होते. पण, मला वाटते की, भाजपाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता आधी स्वतःचा पक्ष उभा करायलाही शिकावे, असा पलटवार राज ठाकरेंनी केला आहे.
लोकांच्या कंनपट्टीवर बंदूक ठेवायची आणि त्यांना पक्षात आणायचं. त्यानंतर ती लोक गाडीत झोपून जाणार. आणि म्हणणार, मी तुला गाडीत दिसलो का म्हणजे महाराष्ट्रात निर्लज्जपणाचा कळस सुरू आहे, अशी जोरादार टीका त्यांनी केली आहे.
आपण या सरकारमध्ये का आलाय महाराष्ट्राचा विकास करायला, कशाला खोट सांगत आहेत. पंतप्रधान यांनी घोटाळे काढल्यावर लगेच तोंड घेऊन इकडे आले. भुजबळ यांनी सांगितले असेल आत काय काय असतं, असेही राज ठाकरेंनी म्हंटले आहे.