अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपला माघार घेण्यासाठी राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र 'स्क्रिप्ट'चा भाग - संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. आज राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. त्यावेळी मुंबई सत्र न्यायालय परिसरात माध्यमांसोबत चर्चा करत असताना संजय राऊतांनी वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी अंधेरी पोटनिवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, ही भाजपने निवडणुकीतुन माघार घ्यावी असे मागणीचे पत्र राज ठाकरे यांनी फडणवीसांना लिहले. त्यावरच आता संजय राऊत यांनी बोचरी टीका केली आहे.
काय म्हणाले राऊत?
अंधेरी पोटनिवडणुकीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र हे 'स्क्रिप्ट'चा भाग आहे. अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष 45 हजारांच्या मताधिक्यानं जिंकणार होता. त्यामुळे भाजपने उमेदवार मागे घेतला. पोटनिवडणुकीत पराभवाची चाहूल लागल्यामुळे उमेदवारी अर्ज भाजपने मागे घेतला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, "भाजपनं या मतदारसंघात वैयक्तिक सर्वे केला होता. त्यामध्ये त्यांना ऋतुजा लटके विजय होणारच यासंदर्भात माहिती मिळाली होती." असे वक्तव्य मुंबई सत्र न्यायालय परिसरात खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.
काल अंधेरी पोटनिवडणुकीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही पोटनिवडणुक बिनविरोध करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकी निवडणुकीतून माघार घेतली असून ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.